3D मॉकअप · उद्योगानुसार पॅकेजिंग Mockup · रमजान आणि ईदच्या भेटवस्तू
ईदचे पेपर बॉक्स हे गल्लीतल्या बेकरीपासून ऑनलाइन सुका मेवा ब्रँडपर्यंत सर्वात जास्त वापरले जातात: रिबन ओढणीचा ड्रॉवर बॉक्स, कुकीज बॉक्स, विंडो कुकीज बॉक्स, पिलो बॉक्स, मोठा हेक्सागॉन बॉक्स आणि हेक्सागॉन चॉकलेट बॉक्स. हे फ्लॅट येतात, कमी जागा घेतात आणि शेकडो-हजारोंच्या ऑर्डरमध्ये रिजिड बॉक्सपेक्षा खूप स्वस्त पडतात. या पेजवर त्यांचेच मॉकअप आणि बारकावे आहेत.
असेही शोधले जाते: eid box mockup · ईद पेपर बॉक्स · dates box mockup · pillow box mockup · रमजान कुकीज बॉक्स
खजूर, कुकीज आणि मिठाईसाठी 300 ते 350 GSM FBB किंवा ड्युप्लेक्स बोर्ड पुरेसा आहे. चिकट खजूर आणि तुपातल्या मिठाईसाठी आत बटर पेपर किंवा ग्रीसप्रूफ कोटिंग ठेवा. जड सुका मेवा बॉक्ससाठी जाड बोर्ड किंवा तळाला दुहेरी थर.
गडद हिरव्या किंवा नेव्ही मॅट लॅमिनेशनवर सोनेरी फॉइल, जाळीच्या नक्षीवर स्पॉट UV आणि चंद्रकोरीवर एम्बॉसिंग, ही ईदची सर्वात आवडती फिनिशिंग आहे. पिलो बॉक्सवर एक-दोन खजूर किंवा चॉकलेट रिटर्न गिफ्ट म्हणून छान जातात.
झाकणावर ब्रँड आणि ईद मुबारक, बाजूला घटक, Veg चिन्ह, FSSAI लोगो आणि लायसन्स नंबर, तळाशी MRP, वजन, बेस्ट बिफोर आणि पत्ता. जाळीची नक्षी कोपऱ्यांवर जुळते ना हे 3D मध्ये पाहा. ब्लीड 3 mm ठेवा.
खजूर कप्प्यात किंवा पेपर कपमध्ये ठेवून आतले माप घ्या, आणि Drint मध्ये तो साइज टाका.
हो, पिलो बॉक्सचा 3D मॉकअप आहे.
Pro मध्ये आपल्या साइजची डायलाइन SVG, PDF, AI, DXF आणि CF2 मध्ये मिळते.